बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई विमानतळावर एअर अॅम्ब्युलन्सची इमर्जन्सी लँडिंग; पाहा व्हिडीओ

मुंबई | जेट सर्व्ह एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं एक विमान नागपूरहून रुग्णाला घेऊन हैदराबादकडे निघालं होतं. पण उड्डाणादरम्यान अचानक या विमानाचं एक चाक निखळलं. त्यामुळे या विमानासाठी पूर्ण इमर्जन्सी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर हे विमान सुरक्षितरित्या उतरवण्यासाठी मुंबईकडे वळवण्यात आलं. आणि त्यानंतर या एअर अॅम्ब्युलन्सची थ्रिलर लँडिंग करण्यात आली.

सी-90 विमान नागपूरहून हैदराबादसाठी उड्डाण केलं. एअर अॅम्ब्युलन्समध्ये क्रू मेंबर्स, एक डॉक्टर आणि एक रूग्ण असे एकूण पाच लोक उपस्थित होते. नागपूर विमानतळावरुन टेकऑफ केल्यानंतर एक चाक खाली कोसळले आणि जमिनीवर पडले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उड्डाणातील उपस्थित वैमानिकांनी समजूतदारपणा दाखवत बेली लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी मुंबई विमानतळावर एअर अॅम्ब्युलन्सचं लँडिंग करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून आधीच आवश्यक पथक स्टँडबाईवर ठेवण्यात आले होते. सीआयएसएफ, बचाव आणि वैद्यकीय पथकही घटनास्थळी उपस्थित होते. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे, असं मुंबई विमानतळाकडून सांगण्यात आलं आहे.

विमानाचं वजन कमी करण्यासाठी त्यातील इंधन संपवणं गरजेचं होतं, यासाठी या विमानाला हवेतच काहीकाळ घिरट्या घालायला सांगण्यात आले. त्यानंतर त्यातील प्रवाशांना बाहेर काढणं गरजेचं होतं. त्यानंतर चाक निखळलेलं विमान धावपट्टीवर उतरवताना त्याला आग लागू नये म्हणून सीएसएमआयएनं मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर फोमचं गुळगुळीत आवरण तयार केलं होतं.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या-

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियात बदली!

कोरोना पॉझिटिव्ह नवरा अन् गुडघ्याला बाशिंग; कोरोनाबाधित असतानाही नवरदेव चढला बोहल्यावर, अन्…

मोठी बातमी! राज्यातील आणखी एक जिल्हा अत्यावश्यक सेवा वगळता राहणार पुर्ण बंद

“अशोकराव, जे तुम्हाला जमलं नाही, त्याचं खापर देवेंद्रजींच्या डोक्यावर फोडता येणार नाही”

दिलासादायक बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More