मुंबई | मनसेचे 50 पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. मनसे शहर आणि जिल्हा कार्यकारिणीत नव्या वर्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
यासंबंधी नाशिकचे मनसे सचिव पराग शिंत्रे यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे मनसेच्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
याबैठकीत तब्बल 50 पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्वाचा आहे- बच्चू कडू
बच्चू कडूंनी केलेली मदत ‘तो’ विसरला नाही; न सांगताच केलं कौतुकास्पद काम!
अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका!
राज ठाकरेंची मराठी माणसाबद्दलची भूमिका मान्य, पण…- देवेंद्र फडणवीस
‘भारत बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागं करा- अशोक चव्हाण
Comments are closed.