चंद्रपूर महाराष्ट्र

पूरग्रस्त कुटुंबांना 10 हजारांची तातडीची मदत थेट खात्यात जमा होणार- विजय वडेट्टीवार

चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब 10 हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

पुर्णतः उध्वस्त झालेल्या घरांना 95 हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी 50 हजार आणि अंशतः पडझड झाली असेल तर 15 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार असल्याचं कळतंय.

पुढील 2 ते 3 दिवसात पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील 8 ते 9 हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजारांची मदत दिली जाणार आहे. परवापासून नुकसान झालेल्या शेताच्या पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजार मदत दिली जाणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी; झोप काढा आणि कमवा 1 लाख रुपये

रिया चक्रवर्ती आणि भाऊ शौविकला अटक अटळ?

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांंचं निधन

फेसबुकची ऑस्ट्रेलिया सरकारला धमकी?, म्हणाले…

सुरेश रैनानंतर ‘या’ खेळाडूचीही चेन्नई सुपर किंग्जला सोडचिठ्ठी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या