बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात आणीबाणीसारखी परिस्थिती- खासदार सुप्रिया सुळे

मुंबई | आजही देशात आणीबाणी सारखीच परिस्थिती दिसत आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होताना दिसत आहे. वर्तमानपत्रांवर कारवाई, पुस्तकांना विरोध करणे अशा घटना समोर येताना दिसत आहेत. गेल्या पाच ते सात वर्षात ही अस्वस्थता दिसून येत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 75 वर्षात महाराष्ट्राने शिक्षण, आरोग्य, शेती क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. महाराष्ट्रात अनेक मोठ्या शिक्षण संस्था सुरू झाल्या आणि त्यांनी चांगलं काम केलं आहे, सुप्रिया सुळे म्हणाल्या. लोकसंख्या, पर्यावरण या सारखे गंभीर विषय आपल्यासमोर आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा असंही सुळे म्हणाल्या. एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.

राजकीय मतभेद असलेच पाहिजेत परंतू द्वेष असू नये. अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह, राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात विरोधकांनी सुचवलेल्या सुचनांचे आनंदानं स्वागत करत होते. संसदेमध्ये लोकहितासाठीच चर्चा होत असते. आम्ही सुचवलेल्या सुचना मान्य केल्या तर समाजाचं चांगलंच होणार आहे. संसदेमध्ये चर्चा होतच असते. त्यापलीकढे होणारी चर्चासुद्धा महत्वाची आहे. मात्र, केंद्र सरकारमध्ये ऐकण्याची क्षमता कमी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, मागील काही वर्षामध्ये जात, धर्माचे विषय शाळा, कॉलेजपर्यंत येत नव्हते. मात्र, गेल्या काही वर्षात जाणवत आहे. नव्या पीढिला अशा गोष्टी आवडत नाहीत त्यांना मेरीट हवं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“इंग्रजांनी भारताची लूट केली, त्यांच्यावरचा राग अजूनही डोळ्यात माझ्या सलत आहे”

“घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा”

‘लोकसभेवेळी दानवेंनी पैसै वाटून माझा पराभव केला’; शिवसेनेच्या बड्या खासदाराचा गंभीर आरोप

मुसळधार पावसामुळं लिफ्टमध्ये घुसलं पाणी अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयानंतर अभिनेता प्रशांत दामले यांचा सरकारला टोला, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More