शरद पवार यांच्यावर रात्री तातडीची शस्त्रक्रिया, प्रकृतीबाबत राजेश टोपे यांनी दिली माहिती
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने काही दिवसांपुर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शरद पवारांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान डाॅक्टरांकडून करण्यात आलं होतं. पित्ताशयात झालेल्या खड्यांमुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं. त्यानंतर त्यांची 31 मार्चला शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, मंगळवारी पोटदुखीचा त्रास वाढल्यानं ठरलेल्या वेळेआधी शरद पवारांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
शरद पवार यांना होत असलेला पोटदुखीचा त्रास वाढल्यानं मंगळवारी रात्री त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी त्यांना मंगळवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शरद पवारांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर पवारांची प्रकृती चांगली असुन, पित्ताशयात असलेले खडे बाहेर काढण्यात आले असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे.
काही चाचण्या केल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतच्या आम्हाला काही समस्या दिसून आल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पित्ताशयात असलेले खडे बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डाॅक्टर अमित मायदेव यांनी दिली आहे.
दरम्यान, पुढील दहा दिवस शरद पवारांना रूग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे. मंगळवारी पवारांच्या शस्त्रक्रिया करण्याआधी अजित पवार आणि सुप्रिया सुळे रूग्णालयात आले होते. तर पहाटे 4 वाजता राजेश टोपे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं माध्यामांना सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
आयपीएलच्या सर्व संघांना मोठा धक्का, बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मोठी बातमी! शताब्दी एक्सप्रेसच्या आगीनंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमारला कोठडीत खायला मटण”
पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 3 हजार पार!
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.