बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी IPS संजीव भट्ट यांच्या पत्नीची भावनिक साद, म्हणाल्या…

सुरत | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांचं नाव घेऊन केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांना लक्ष्य केलं होतं. यानंतर गुजरातमधील संजीव भट्ट प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. आता संजीव भट्ट यांच्या पत्नीने संजीव भट्ट यांच्या ट्विटर हँलडवरुन ट्विट करत भावनिक आवाहन केलं आहे.

आज 2 वर्षे 8 महिने आणि 9 दिवस झाले. संजीव भट्ट यांना चुकीच्या पद्धतीने राजकीय षड्यंत्रात अडकवून तुरुंगात टाकण्यात आलं आहे. संजीव यांच्या मुखातील सत्य दाबण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं, असं त्यांच्या पत्नीने सांगितलं आहे.

गेल्या 32 महिन्यांपासून तुरुंगात राहूनही त्यांनी गुन्ह्याची कबुली केली नाही, याउलट न्यायालयाकडे दाद मागितली आहे. या शिक्षेसंदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील पहिली सुनावणी 30 मार्च 2021 रोजी गुजरात उच्च न्यायालयात होत आहे. त्यामुळे, सत्य आणि न्याय मिळेल यासाठी आपण प्रार्थना करत आहे, न्यायाची अपेक्षा आहे, असं संजीव भट्ट यांच्या पत्नी श्वेता भट्ट यांनी म्हटलंय.

दरम्यान, गुजरातमध्ये आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनीही तत्कालीन गुजरात सरकारबद्दल पत्र लिहून अनेक गोष्टी उघडकीस आणल्या होत्या, त्यावेळी त्या पत्राबाबत काय कारवाई केलीत?, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता.

 

थोडक्यात बातम्या- 

‘ही’ प्रसिद्ध गायिका लवकरच करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

“रिषभ पंत असाच खेळत राहिला तर एक दिवस धोनीलाही मागे टाकेल”

महाराष्ट्रात कोणासोबत सरकार बनवणार… अमित शहांच्या नव्या वक्तव्याने मोठी खळबळ

अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यात यश ; मंत्री यशोमती ठाकूर यांची धडक कारवाई

शेतकऱ्यांचा संताप अनावर; भररस्यात भाजप आमदाराचे कपडे फाडून केली मारहाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More