बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फोन परत द्या, मोबाईलमध्ये माझ्या आईच्या आठवणी आहेत”; 9 वर्षाच्या मुलीचं भावनिक पत्र

बंगळुरू | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं संपूर्ण देश चिंताग्रस्त झाला आहे. कित्येक घरं कोरोनानं उद्धवस्त झाली. लहान मुलं पोरकी झाली, त्यांचा आधार नियतनं काढून घेतला. काही ठिकाणी माणुसकीचं दर्शन होताना दिसत होतं. तर काही ठिकाणी माणुसकीला लाजवणाऱ्याही घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. एका 9 वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीनं आपल्या आईचा फोन गायब झाल्यामुळं हे पत्र लिहलं आहे. या पत्राची दखल कर्नाटकच्या पोलिसांनीही घेतली असून ते त्या मुलीच्या आईचा फोन शोधत आहे.

पत्र लिहिणाऱ्या मुलीचं नाव हृतिकक्षा आहे. या मुलीच्या आईचा 16 मे रोजी कोरोनामुळे रूग्णालयात मृत्यू झाला. ती मुळची कुशालनगरची आहे. तिने कोडागुचे उपायुक्त, आमदार आणि जिल्हा कोव्हिड रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी हे पत्र लिहलं आहे. तिने या पत्रात लिहलं आहे की, ‘मी, आणि माझ्या आईवडिलांनी आम्ही तिघांनी कोरोना चाचणी केली होती. आईची तब्येत खराब झाल्यानं आम्ही तिला मदिकेरी या कोव्हिड सेंटरमध्ये तिला उपचारासाठी दाखल केलं होतं. माझे वडिल मोलमजूरी करतात. आम्ही या कोरोनाकाळात शेजाऱ्यांच्या मदतीनं जीवन जगत आहोत. 16 मे ला माझ्या आईचा मृत्यू झाला. रूग्णालयात कोणीतरी माझ्या आईचा मोबाईल घेतला. मी माझ्या आईला गमावलं, मी पोरकी झाली. त्या फोनमध्ये माझ्या आईच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे ज्या कोणी हा फोन घेतला असेल त्यांनी तो या पोरक्या मुलीला परत करावा, अशी विनवणी तिनं केली आहे’.

हृतिकक्षाच्या वडिलांनी सांगितलं की, ‘माझी पत्नी टीके प्रभाने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर तिच्याकडील वस्तू आम्हाला सोपवण्यात आल्या पण त्यातील मोबाईल गायब होता. आम्ही त्यावर कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नंबर स्विच ऑफ येत आहे. जेव्हापासून हा फोन नाही तेव्हापासून माझी मुलगी खूप रडत आहे. त्या फोनमध्ये आमच्या कुटुंबातील अनेक फोटो, व्हिडीओ आहेत’.

दरम्यान, या 9 वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अनेक युजर्सने पोलिसांना या प्रकरणी कारवाई करण्याचं आवाहन केलं. एका ट्विटला उत्तर देताना कर्नाटकचे डीजी आणि आयजीपी प्रविण सूद म्हणाले की, आमची टीम हा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही लवकरात लवकर हा फोन शोधू असा विश्वास त्यांनी दिला आहे

थोडक्यात बातम्या –

देशातील नव्या कोरोनाबाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा वाढला

1 जूननंतर महाराष्ट्रातील एवढे जिल्हे वगळून लॉकडाऊन उघडणार?; या मंत्र्याचं सूचक वक्तव्य

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंची महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात; आज ‘या’ ठिकाणी देणार भेट

‘तेरी मिट्टी में मिल जावां…’; कोरोना योद्ध्यांसाठी जवानाने वाजवली मनमोहक धून, पाहा व्हिडीओ

ब्राह्मण समाजातील एक वर्ग मोठ्या प्रमाणात गरीब, म्हणून भाजपने… – चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More