बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भावनिक, मानसिक लिंचिंगमुळे सुशांतचा बळी गेला- कंगणा राणावत

मुंबई | सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यामुळे सगळं बॉलिवूड हादरलं आहे. अशात कंगणा राणावतने सुशांतचा बळी हा इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे गेला, असा आरोप केला आहे.

भावनिक, मानसिक लिंचिंग केलं गेल्याने सुशांत सिंह राजपूत या कलाकाराने आत्महत्येचं पाऊल उचललं असा नवा आरोप आता अभिनेत्री कंगणा राणावतने केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर नवा व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुशांतसिंग राजपूतच्या हत्येनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी मी वाचल्या तर काही मी पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. बॉलिवूडमध्ये त्याच्यासोबत जे काही घडत होतं त्यामुळे तो त्रस्त झाला होता असं सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितल्याचं कंगणाने सांगितलं आहे.

बॉलिवूडच्या मू्व्ही माफियांनी अत्यंत पद्धतशीरपणे सुशांतची बदनामी केली. त्याचं नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरु केले. ज्यामुळे हळूहळू सुशांत नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला, असं कंगणाने सांगितलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

MPSC परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा पठ्ठ्या प्रसाद चौघुले राज्यात अव्वल

‘तो’ रस्ता भारतासाठी महत्त्वाचा; शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला

महत्वाच्या बातम्या-

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर देण्यात आली ‘ही’ नवी जबाबदारी

कोव्हिड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी ससून रुग्णालयाला 12 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर- अजित पवार

‘वरुण, सिद्धार्थपेक्षा सुशांतचं भविष्य उज्वल असेल’; इम्रान हाश्मीचा ‘तो’ व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More