महाराष्ट्र मुंबई

चेंबुरच्या दुर्घटनेत अडकलेले कामगार सुखरूप

मुंबई | चेंबूरच्या माहुलीगावात बीपीसीएल प्लांटच्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. शिवाय सर्व कामगार सुखरूप आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. 

प्लांटमध्ये दुर्घटना घडल्याचे समजल्यानंतर कामगारांचे फोन लागत नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. शिवाय पावसाने हजेरी लावून दिलासा दिला आहे. 

दरम्यान, बीपीसीएलच्या प्लांटमध्ये स्फोट होऊन आग लागली होती. आगीत 200 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त होत होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-चेंबुर हादरलं; पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट

-आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्तानं लिहिलेलं निवेदन!

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या