बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन डोस घ्या अन्यथा…’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिला इशारा

पिंपरी-चिंचवड | गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, तिही हळूहळू ओसरताना दिसत आहे. या कोरोनासारख्या महाभंयकर आजाराला तोंड देण्यासाठी सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणं आवश्यक आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे आरोग्य निरोगी राहावे आणि त्यांना कोरोनापासून संरक्षण मिळावे. यासाठी महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. परंतू एवढं असूनही काही कर्मचाऱ्यांनी अजूनही लस घेतली नसल्याचं दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेच्या आस्थापनावरील अधिकारी, कर्मचारी आणि मानधनावरील ठेकेदारीपद्धतीच्या कर्मचाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी अजूनही कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांनी 20 जूलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत. अन्यथा त्या कर्मचाऱ्यांचा जूलै महिन्याचा पगार स्थगित ठेवण्यात येणार असल्याचं राजेश पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट कुठं सरत नाही, तर डेल्टा प्लस व्हेरिएंट नावाच्या विषाणूने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. तिसऱ्या लाटेमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे 50 लाख लोकांना त्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्यातील 10 टक्के लहान मुलांना धोका असू शकतो. म्हणजेच तिसऱ्या लाटेत 5 लाख मूलांना त्या विषाणूची लागण होऊ शकते, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

इस्ज्ञायल दूतावासाने मराठीतून ट्वीट करत ‘या’साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केलं अभिनंदन

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 3 चिमुकल्यांनी केली डेल्टा प्लस विषाणूवर मात

जॅकी श्राॅफच्या मुलीचा लुक पाहून सर्वच झालेत हैराण, चाहते देखील म्हणाले… पाहा फोटो

“विधानसभेच्या अध्यपदासाठी आमचा काँग्रेसला पाठिंबा”

मोठी बातमी! 24 तासात जम्मू-काश्मिरात आढळून आले 2 संशयास्पद ड्रोन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More