बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात गेल्या 45 वर्षातला सर्वात वाईट बेरोजगारी दर, GDP ही घसरला!

नवी दिल्ली | शुक्रवारी सेंट्रल स्टॅटिस्टिक्स कार्यालयाने बेरोजगारीची आकडेवारी जारी केलेली आहे. यात 2017-18 या आर्थिक वर्षातील भारतातील बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर गेला आहे. जो गेल्या 45 वर्षातली सर्वात वाईट बेरोजगारी दर आहे.

जीडीपी वाढीच्या दरातही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. 2017-18  या आर्थिक वर्षात 7.2 टक्क्यांवर असणारा जीडीपी दर 2018-19 या आर्थिक वर्षात 6.8 टक्क्यांवर आला आहे.

जानेवारी-मार्च या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर हा 2014-15 पासून ते आतापर्यंतचा सर्वात कमी दर होता. या अगोदर 2013-14 मधला 6.4 टक्के हा सर्वात निच्चांकी दर होता.

शेती आणि निर्मिती क्षेत्रातील खराब प्रदर्शनाचा जीडीपाला फटका बसला असल्याचं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या

-मोदींनी जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला; घेतला हा मोठा निर्णय

-मोदी सरकारने घेतला पहिल्या कॅबिनेटमध्ये महत्वाचा निर्णय

-नरेंद्र मोदींनी दिलेल्या मंत्रिपदाबाबत दानवे म्हणतात…

-वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा केला दारूण पराभव!

-धक्कादायक! त्यानं भरदिवसा तिच्यावर कोयत्याने वार केले; लोक फक्त पाहत राहिले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More