बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली रद्द; मॅटकडून मोठा निर्णय

मुंबई | काही दिवसांपुर्वी एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली करण्यात आली होती. दया नायक यांची दहशतवादी विरोधी पथकातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांना थेट गोंदियात पाठवण्यात येणार होतं. एटीएसमधून दया नायक यांची गोंदियाच्या जिल्ह्यात जात प्रमाणपत्र समिती येथे बदली करण्यात आली होती. परंतू आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

काही दिवसांपुर्वी 7 मुंबई पोलिसांतील बदल्या केल्या गेल्या होत्या. त्यात दया नाईक यांचं देखील नाव होतं. या निर्णयाला दया नाईक यांनी मॅटमध्ये आवाहन दिलं होतं. या प्रकरणावर आता मॅटने त्यांची बदली थांबवली आहे. आणि पुन्हा त्याच पोलिस ठाण्यात त्यांना रूजू होण्यास सांगितलं आहे.

मुंबईबाहेर त्यांचा जिवाला धोका असल्यानं मॅटने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत होते. या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावं लागलं होतं.सचिन वाझे प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण 6 टीम बनवण्यात आल्या आहेत. त्यातील जुहू एटीएसच्या टीमचे प्रभारी इन्चार्ज म्हणून दया नायक काम पाहत होते.

दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना धमक्या आल्याची चर्चा होती. त्याच्या तपासाचं कामसुद्धा दया नायक यांच्याकडेच होतं.

थोडक्यात बातम्या-

लॉकडाऊनला कंटाळून सलून व्यावसायिकाची आत्महत्या; ‘या’ शहरातील धक्कादायक घटना

…म्हणून भारतीय संघात भुवनेश्वरला स्थान मिळालं नाही, समोर आलं मोठं कारण!

आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार प्रकरणात CCTV फुटेज व्हायरल ; पाहा व्हिडीओ

लसीसंदर्भात महत्त्वाची बातमी; सीरम, बायोटेक कंपनीकडून मोठी घोषणा

चिंता वाढली! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात म्युकरमायकोसिसचे तब्बल 111 रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More