बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

मुंबई | मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याची शक्यता असून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. एनआयएच्या कार्यालयात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्य राखीव दलाचं पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलं आहे. प्रदीप शर्मा यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते.

थोडक्यात बातम्या- 

भाजपला धक्का; माजी मंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत!

आयटीचं बँड वाजणार, 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

शिवसेनेनं आता सामना बंद करून बाबरनामा काढावा- अतुल भातखळकर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आधी सचिनने भारतीय संघाला दिल्या ‘या’ खास टिप्स

“काँग्रेस पक्ष म्हणजे टायटॅनिकचं जहाज, तो बुडतच चाललाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More