महाराष्ट्र मुंबई

संपूर्ण वीजबिल एकाच वेळी भरल्यास ‘इतक्या’ टक्क्यांची सूट; ऊर्जामंत्र्यांची घोषणा

मुंबई | राज्यामध्ये वाढलेल्या वीज बिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सर्वसामान्यांपासून कलाकार मंडळीही तक्रार करत आहे. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी तीन आठवड्याची सवलत देण्यात आली आहे. तर जे घरात राहत नव्हते. त्यांचं प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग घेतलं जाईल, असं उर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले.

लॉकडाऊन काळात जे मार्गदर्शक तत्वानुसार मिटीर रिडिंग बंद करण्यात आले होते. त्यानंतर काही गैरसमज बिलाबाबत झाले होते. त्या पार्श्वभूमीवर तीन आठवड्याची सवलत वीज बिल भरायला देण्यात आली आहे, असं राऊतांनी सांगितलं आहे.

ज्या ग्राहकांना तक्रारी असतील त्यांच्यासाठी उर्जामंत्र्यांचा ईमेल आयडी देण्यात आला आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेक नागरिकांनी वर्क फ्रॉम होम केले आहे. त्यामुळे वीजेचा वापर गेल्या वर्षापेक्षा जास्त केला आहे, असंही उर्जामंत्र्यांनी सांगितलं.

जून महिन्यात आलेल्या एकत्रित भरमसाट वीज बिलांमुळे ग्राहक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण बिल एकत्रित भरल्यास दोन टक्क्यांची सूट दिली जाईल, अशी घोषणाही नितीन राऊत यांनी करून वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

कोरोनापाठोपाठ चीनमध्ये आणखी एक विषाणू आढळला

‘ओडिशापेक्षा कोकणातील वादळाची तीव्रता कमी’; दरेकरांचा अजब तर्क

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी आता बाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाची होणार चौकशी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या