Top News

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा विजय

कार्डिफ | अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने भारतावर मात केली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवल्यामुळे इंग्लंडने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी स्वीकारली. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला. रोहित शर्मा अवघ्या 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलही लगेच बाद झाले. कोहली-रैना-धोनीने सावध खेळी करत इंग्लंडपुढे विजयासाठी 149 धावांचं आव्हान दिलं.

इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सनं 41 चेंडूत 58 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं 2 चेंडू शिल्लक असताना भारतावर विजय मिळवला. मालिका कुणाची हे आता शेवटचा सामना ठरवणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-संभाजी भिडेंनी आम्हाला शब्द दिलाय; शिवसेनेचा दावा

-मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाटण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा डाव फसला, गुन्हे दाखल

-ख्रिश्चनांच्या देशप्रेमाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी कराल तर आता मार पडेल!

-नागपुरात जास्त पाऊस झाला, त्याला आम्ही काय करणार?- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या