बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाॅस द बॉस! अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत बटलरने ठोकलं दमदार शतक; पाहा व्हिडीओ

मुंबई | टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत इंग्लड संघ सध्या दमदार कामगिरीसह ग्रुपमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंकेने सर्व प्रथम इंग्लडला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं.  इंग्लडचा धमाकेदार फलंदाज जाॅस बटलरने आज लंकेच्या गोलंदाजाचा घामटा काढत वर्ल्ड कपमधील पहिल शतक ठोकलं आहे.

जेसन रॉयला हसरंगाने बाद केल्यानंतर जाॅस बटलरने आपल्या हाती खेळ घेतला. श्रीलंकेच्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमक खेळ करत बटलरने 67 चेंडूत 101 धावांची तुफानी खेळी साकारली. शेवटी एक चेंडू शिल्लक असताना बटलरला शतक साजरे करण्यासाठी 4 धावांची गरज होती. तेव्हा श्रीलंकेच्या चामीराच्या शेवटच्या चेंडूंत त्याने उत्तुंग षटकार ठोकत टी-20 वर्ल्ड कपमधील पहिलं शतक साजरा केला.

जाॅस बटलरच्या तुफानी खेळी 6 गगनचुंबी आणि 6 खणखणीत चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर कर्णधार ईयान मॉर्गनने 36 चेंडूंत 40 धावांची भर घातली. आणि इंग्लडने लंकेसमोर 163 धावांच लक्ष्य ठेवलं. त्यानंतर श्रीलंकेचा संघ फलंदाजी करताना गडगडल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, हसरंगा गोलंदाज सोडून लंकेच्या एकाही गोलंदाजाला चागंली कामगिरी करता आली नाही. हसरंगाने 4 षटकमध्ये 21 धावा देत 3 फलंदाजांना तंबूत धाडलं. तर चामिराला एका गड्याला बाद करण्यात यश आलं.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

थोडक्यात बातम्या- 

“अजित पवार आणि अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”

“मी नशीबवान आहे, माझी मुले ड्रग्स घेत नाहीत, त्यांनी अद्याप…”

उत्सुकता शिगेला! देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी

“पंतप्रधान मोदींनी लवकरात लवकर गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावं”

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More