बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुम बुमच्या बुमराहच्या आग ओकणाऱ्या यॉर्करवर इंग्लंड फलंदाजांच्या दांड्या गुल, पाहा व्हिडीओ

मुंबई |  भारताने चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. भारताचा हा विजय ऐतिहासिक आहे. ओव्हलच्या मैदानावर भारताने तब्बल 50 वर्षानंतर इंग्लंडला पराभूत केलं आहे. या सामन्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने आक्रमक गोलंदाजी केली आहे. बुमराहच्या यॉर्करचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.

बुम बुम बुमराहने जे दोन यॉर्कर टाकले ते पाहून तुम्हीही भारावून जाल. बुमराहने इंग्लंडचे फलंदाज पोप आणि बेअस्टोला बाद केलं. बुमराहच्या आग ओकत आलेल्या यॉर्कर खेळताना दोन्ही फलंदाजांची भंबेरी उडाली.

बुमराहने जबरदस्त याॅर्कर टाकून इंग्लंजच्या ऑली पोपला विकेट घेतली. त्याचबरोबर त्याने आपल्या करियरमध्ये 100वा विकेट घेतला आहे. केवळ 24 सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. त्यासोबत बुमरहाने महान गोलंदाज कपील देव यांना मागे टाकत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात भारताकडून खेळताना बुमराह सर्वात जलद 100 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी 25 सामन्यात 100 विकेटचा टप्पा पार केला होता. तर इरफान पठाणने 28 सामन्यात ही कामगिरी केली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यात मुसळधार पाऊस! दोन दिवसात राज्यातील पावसाचा जोर वाढणार

दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, वाचा आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

करुणा शर्मांची बीड जिल्हा कारागृहात रवानगी, पाहा व्हिडिओ

भाजपला मोठा धक्का! मोदी लाट आता चालणार नाही, ‘या’ अहवालातून स्पष्ट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More