बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंग्लंड संघाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहला जखमी करण्याचा प्रयत्न करणारा इंग्लिश गोलंदाज बाहेर

मुंबई | भारत विरुध्द इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या बुधवारी होणार आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी केलेल्या दमदार भागिदारीने विजयाचा पाया रचला होता. मात्र सामन्यामध्ये इंग्लिश गोलंदाजाने रडीचा डाव खेळला. मार्क वूडने बुमराहला जखमी करण्याचा प्रयत्न केला होता.

मार्क वूड हा दुखापतीमुळे तिसरा कसोटी सामना खेळणार नाही. मार्क वूडला दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी दुखापत झाली होती. कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी मार्क वूड याने गोलंदाजी करताना भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याला जखमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्या दोघांमध्ये आगपाखड झालेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्यांच्यातील चुरस बघण्यासाठी क्रीडाप्रेमी उत्सुक होते.

मात्र आता मार्क वूडच आता दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. मार्क वूड बाहेर पडल्यानं इंग्लंडला आता नव्याने विचार करावा लागेल. मार्क वूडच्या जागी साकीब महमुद खेळण्याची शक्यता आहे. पाकिस्तान विरुध्दच्या वनडे क्रिकेट सामन्यात साकीब महमुदने 9 विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, कसोटी सामन्यात टीम इंडियाकडून पराभव झाल्यामुळे इंग्लंडने टीममध्ये अनेक बदल केले आहेत. इंग्लंडने तीन खेळाडूंना संघातून वगळले आहे. यामध्ये क्रउले, डॉम सिल्बी तसेच जॅक लीच यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘अजितदादा काय म्हणतात त्याला….’; अजित पवारांच्या टीकेला पडळकरांचं जोरदार प्रत्युत्तर!

अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी केंद्राची हालचाल??; उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

बांद्राच्या कॅफेत सनी लिओनीची ‘खास’ झलक, पाहा व्हिडीओ!

दुबईमध्ये होणाऱ्या आयपीएलमधून ‘हे’ खेळाडू बाहेर, पाहा व्हिडीओ

लोकहो सावध राहा! तिसऱ्या लाटेबाबत नीती आयोगाचा अत्यंत गंभीर इशारा, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More