Loading...

वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंडची इज्जत धुळीला; आयर्लंडविरुद्ध २ आकडी धावसंख्येत सर्वबाद

लंडन | आयसीसी विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून विश्वचषक मिळवणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघाला मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला आहे. आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 85 धावात बाद झाला आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात आयर्लंडच्या मुर्तघने 9 षटकात 13 धावा देत 5 विकेट्स घेतल्या, तर मार्क एडरने 3 आणि बॉईड रँकिनने 2 फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

Loading...

जेसन रॉयने 11 चेंडूत अवघ्या 5 धावा केल्या, तर दुसरीकडे इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार ज्यो रुट फक्त 2 धावा करुन माघारी परतला. विश्वचषक विजेत्या संघातील इतर फलंदाजांनाही काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर आता मोठ्या प्रमाणात टीका होण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या थरारक अंतिम सामन्यात इंग्लंडने सुपरओव्हरमध्ये आयसीसीच्या एका नियमामुळे सामना जिंकला होता. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडने बरोबरीत धावा केल्या होत्या, मात्र इंग्लंडचे चौकार जास्त असल्याने न्यूझीलंडने विजेतेपद गमावलं.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-अबब..! विराट कोहलीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टला मिळते एवढी मोठी रक्कम

-तुम्हाला धडा शिकवू, निवडणुका लढू म्हणणाऱ्या मराठा मोर्चेकऱ्यांना इशारा

-“प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही हे एक दिवस भाजपला कळेल”

Loading...

-‘तो’ विद्यार्थी नव्हे तर शिवसैनिक!

-बारामतीत दोन दारु़ड्यांनी एकमेकांना चिखलात लोळवलं

Loading...