बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंग्लडच्या ‘या’ 3 धडाकेबाज खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार!

लंडन | भारतात 2021 च्या आयपीएलचा थरार एप्रिल मध्ये सुरू झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आयपीएलला स्थगिती देण्यात आली होती. परंतू कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यामुळे आयपीएलचे उर्वरीत सामने सप्टेंबर पासून होत आहे. या अगोदर कोरोनामुळे आयपीएलमधून काही परदेशी खेळाडूंनी माघार घेतली होती. अशातच आता इंग्लंडच्या तीन दिग्गज खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.

2021 आयपीएलचे उर्वरित सामने 19 सप्टेंबर पासून युएईमध्ये सूरू होत आहेत. त्यासाठी काही खेळाडू आपापल्या संघासोबत युएईमध्ये दाखल झाले आहेत. इंग्लडचे तीन खेळाडू डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स यांनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. या खेळाडूंनी आयपीएलमधून माघार का घेतली आहे याचं कारण स्पष्ट झालं नाही आहे. मात्र या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक आणि अॅशेस मालिकेसाठी तयारी करण्यासाठी माघार घेतली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आयपीएल 2021 मधून इंग्लडचे मोईन अली, जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, ख्रिस वोक्स आणि सॅम करन हे माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यापैकी तीन खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे बेअरस्टोने माघार घेतल्यामुळे हैदराबाद आणि मलानमुळे पंजाबला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, सप्टेंबरमध्ये होत असलेल्या आयपीएलच्या उर्वरीत सामन्याची प्रतिक्षा क्रिकेटप्रेमी करत होते. त्यामुळे आयपीएलचा थरार पुन्हा एकदा सुरू होत असल्याने क्रिकेटचे अनेक चाहते आनंदी झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

प्रेम म्हणजे प्रेम असतं! घटस्फोट घ्यायला कोर्टात गेले अन् पुन्हा पडले प्रेमात, वाचा सविस्तर

जर ‘हे’ केलं नाहीतर बँकिग सेवेत येणार अडचण; SBI कडून ग्राहकांना अलर्ट

दिलासादायक!’लसींचे दोन डोस घेतलेल्यांना…’; तज्ज्ञांनी केलाय महत्त्वाचा दावा

आघाडीत पुन्हा ठिणगी???; भर बैठकीत शिवसेनेचा ‘हा’ आमदार मदतनिधीवरून भिडला भुजबळांना!

“आंबेडकरी समाजावरील पोस्ट महागात, ‘या’ अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More