बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंग्लंडचा रडीचा डाव! भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात पुन्हा नवा ट्विस्ट

मँचेस्टर | भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळण्यात येणाऱ्या 5व्या कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली होती. सामना रद्द झाल्यानंतर आता चांगलाच वाद रंगल्याचं दिसतंय. त्यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केलेल्या वक्तव्यानंतर आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा कसोटी सामना रद्द केल्यानंतर बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डात दोन फेऱ्यात चर्चा झाली. त्यानंतर हा सामना नंतर खेळवण्यात येईल, असं बीसीसीआयने सांगितलं होतं. त्यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ टाॅम हॅरिसन यांनी एका वक्तव्य केलं.

पाच सामन्याच्या मालिकेत भारत 2-1 ऩे आघाडीवर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सिरीज आता संपली आहे. आता उर्वरित सामना जरी खेळवला गेला, तरी सामना हा मालिकेचा भाग असणार नाही, असं सीईओ टाॅम हॅरिसन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

दरम्यान, बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डामध्ये झालेल्या बैठकीत हा सामना पुढच्या वर्षी घेण्यात यावा, असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला आहे. पुढल्या वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय आणि टी ट्वेटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यावेळी हा सामना खेळवला जाऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार; अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमाला आले तर…’; नारायण राणेंचा ‘त्या’ वक्तव्यावरून यु-टर्न!

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आगीतून फुफाट्यात! विश्वचषकाच्या तोंडावर राशिद खाननं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

रविंद्र जडेजाच्या घरी रंगला ‘राजकीय सामना’; नणंद भावजय आमने- सामने

‘जर ‘या’ नियमांचा भंग झाला तर कलम 144 लागू करणार’; विश्वास नांगरे पाटलांचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More