बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुत्रे अन् माकडांमध्ये युद्ध पेटलं; पिल्लाला मारल्यानंतर ‘बदला’ घेण्यासाठी माकडांनी 250 कुत्र्यांना संपवलं

बीड | एखाद्याला त्रास दिला की त्याचा बदला घेण्याची पद्धत फक्त माणसांमध्येच आहे असं नाही. प्राण्यांनाही भावना असतात आणि त्या भावना दुखावल्या गेल्या की मग बदला घेण्याचा खेळ सुरू होतो. असाच एक धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात घडला आहे.

माजलगाव तालुक्यातील लवुळ गावात गेल्या महिनाभरापासून एक धक्कादायक प्रकार घडत आहे. माकडांच्या झुंडीकडून गावातील कुत्र्यांना उचलून नेण्यात येत आहे. या कुत्र्यांना माकडे उचं इमारती आणि झाडांवर घेऊन जातात आणि त्या ठिकाणावरून त्यांना फेकून देतात. या प्रकारे आतापर्यंत गावातील तब्बल 250 कुत्र्यांचा जीव या माकडांनी घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी कुत्र्यांच्या झुंडीनं माकडाच्या एका पिल्लावर हल्ला करत त्याचा जीव घेतला होता. परिणामी याचा बदला घेण्याचा या माकडांनी ठरवल्याचं या प्रकारावरून लक्षात येत आहे. सदरिल प्रकार घडल्यानं गावातील लहान मुलांपासून गावातील ज्येष्ठांपर्यंत सर्वजण चिंतेत आहेत. असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं सध्या या प्रकारची सर्वत्र चर्चा आहे.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे या लवूळ गावातील लहान मुलांना सुद्धा माकडांकडून आता लक्ष केलं जात आहे. वन विभागाकडं गावातील नागरिकांनी तक्रार केली असता अद्यापी वनविभागानं याप्रकरणात लक्ष घातलं नसल्याचं गावातील नागरिकांनी सांगितलं आहे. परिणामी सध्या गावातील कुत्र्यांनंतर लहान लेकरांना माकडांकडून लक्ष्य करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या 

“अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, त्यांना तर…”

‘शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत अनिल परब की उद्धव ठाकरे?’; रामदास कदम आक्रमक

“लग्नाला उशीर केल्यास मुली पाॅर्न पाहत बसतील, त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवं”

“आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडी सरकार आहे, अशा गर्वात राहू नये”

‘छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ही छोटी गोष्ट आणि…’; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More