मनोरंजन

2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार

मुंबई | मुंबईकरांनो घाबरु नका, संकटाचा सामना करा, असं आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केलं आहे. तसेच मुंबईकरांनी पालिका प्रशासनाच्या सूचनेचं पालन करावं अशी विनंतीही अक्षय कुमारने केली आहे. त्याने या संदर्भात एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.

बईत सध्या पाऊस होत आहे. दरवर्षी सर्वजण याची प्रतिक्षा करत असतो. मात्र 2020 हे एक वेगळं वर्ष आहे. सुरुवातीपासून काही ना काही त्रास देत आहे. पावसाचाही आनंद नीट घेऊ देत नाही. रिमझिम पावसासोबतच चक्रीवादळही येत आहे. जर देवाची आपल्यावर कृपा झाली तर हे वादळ येणारही नाही किंवा या वादळाचा वेग असेल. पण जर हे वादळ मुंबईत आले तरी आपण मुंबईकर घाबरणारे नाही, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.

मुंबई पालिका प्रशासनाने काही महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याची संपूर्ण यादी पालिकेने तयार केली आहे. आपल्याला फक्त त्याचे पालन करायचे आहे आणि आणखी एका संकटाचा सामना करु, असंही अक्षय कुमार म्हणाला.

दरम्यान, जर कोणतीही अडचण आली तर 1916 वर फोन करुन पालिकेची मदत घ्या. अफवांवर विश्वास ठेवा. तसेच घाबरुन जाऊ नका. संकटाचा सामना करा, असंही अक्षय कुमारने व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना कोरोना योद्धा जाहीर करा”

असाल तुम्ही सर्वेसर्वा पण…; राज्यपालांविरुद्ध मनसे नेत्या रूपाली पाटील आक्रमक

महत्वाच्या बातम्या-

निसर्ग चक्रीवादळ धडकण्यापूर्वी पावसाचा तडाखा, पाहा कुठे कुठे आहे पावसाचा जोर?

पुण्यात पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर, पाहा कोणत्या गोष्टी सुरु कोणत्या बंद?

निसर्ग परीक्षा घेतोय पण आपण ताकदीने सामना करु- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या