‘या’ 25 वर्षीय अभिनेत्रीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू, नक्की काय घडलं?

Entertainment News | मुंबईच्या वांद्रे परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यात हिट अँड रन प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई येथे 25 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. आपल्या मित्रासोबत बाईकवकरुन जात असताना डंपरने धकड दिली आणि यावेळी अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय.

नक्की काय घडलं?

शिवानी सिंह असं या अभिनेत्रीचं नाव असून ती मालाडमध्ये राहत होती. या बरोबरच ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Entertainment News) काम करत होती. दरम्यान, शिवानी तिच्या मित्रासोबत वांद्रे येथील आंबडेकर रोडवरुन आपल्या मित्रासोबत त्याच्या दुचाकीवरुन जात होती. यावेळेस डंपरने दुचाकीला मागून धडक दिली, आणि शिवानी डंपरच्या चाकाखाली आली, तर शिवानीचा मित्रा काही अंतरावर पडला. पुढे दोघांनाही जखमी अवस्थेत भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात घेऊन गेल्यावर डाॅक्टरांनी शिवानीला मृत घोषित केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Singh (@shivani.singhh)

मित्राने हेलमेट घातलं?

समोर आलेल्या माहितीनूसार, शिवानी तिच्या मित्रासोबत (Entertainment News) वांद्रे परिसरातून दुचाकीवरुन चालली होती. शिवानीच्या मित्राने हेलमेट घातलं होतं. दरम्यान, शिवानीचा मित्र, दारुच्या नशेत नव्हता. शिवाय, नशेची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार डंपर चालकाचा शोध सुरू आहे. डंपर जप्त करण्यात आला आहे. तिच्या मित्राचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

दरम्यान, वांद्रे येथे असाच काहीसा प्रकार घडला आहे. वांद्रे येथील साधू वासवानी चौकाजवळील पदपथावर अनेक दुचाकी उभ्या असताना भरधाव वेगाने येणाऱ्या या पोर्श कारने त्या दुचाकींना धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

News Title : entertainment news 25 year actress dies in hit and run case

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण; बड्या उद्योगपतीच्या मुलाचा प्रताप

‘ही’ अभिनेत्री अंडरवर्ल्ड डाॅनसोबत बांधणार होती लग्नगाठ, स्वतः केला खुलासा

कुणाचं ब्रेकअप तर कुणाचा घटस्फोट…; यंदा ‘या’ कलाकारांचा संसार मोडला

शिंदेंना गृहखात्यावर पाणी सोडावं लागणार?, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

अजितदादांच्या ‘त्या’ गोष्टीवरून तळपायाची आग मस्तकात गेली; अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?