प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 14 वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ!, मित्रांसोबत बाहेर गेला आणि…

Entertainment News Actress Sapna Singh son found dead in UP

Entertainment News | सिनेविश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ‘क्राईम पेट्रोल’ व ‘सावधान इंडिया’ फेम अभिनेत्री सपना सिंहच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्रीच्या 14 वर्षांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या दोन मित्रांना अटक केली असून या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. (Entertainment News)

प्रसिद्ध अभिनेत्री सपना सिंहचा मुलगा सागर गंगवार हा 9 डिसेंबररोजी रात्री मित्रांबरोबर बाहेर गेला होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याचा घरच्यांकडून सगळीकडे शोध घेण्यात आला. मात्र, दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीच्या मुलाचा मृतदेह हा एका शेतात आढळून आला.

मृत्यू की घातपात?

यावेळी त्याच्या डोक्याला बंदुकीच्या गोळीच्या जखमा होत्या, असं आढळून आलं. तसेच त्याचे हात तुटले होते आणि पोटावरही जखमा होत्या. अभिनेत्रीने या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील बरेली येथे आंदोलन केलं आहे. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी देखील केली आहे.

अभिनेत्रीने सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सागर मित्रांबरोबर जाताना दिसला. मात्र, तो परत घरी आलाच नाही. त्याचा मित्र अनुजने त्याला क्रिकेट खेळण्याच्या आणि वाढदिवसाच्या पार्टीत जाण्याच्या बहाण्याने सोबत नेलं. त्यारात्री सागर सकाळी येईल, असं अनुजने सांगितलं होतं. मात्र सागरचा फोन बंद येत होता, असा खुलासा अभिनेत्रीने केलाय. (Entertainment News)

अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

यानंतर अभिनेत्री सपना सिंहने पोलीस तक्रार दाखल केली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कुटुंबियांना सांगितलं की सागरसारखा दिसणारा एक मृतदेह सापडला आहे. त्यानंतर कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात पोहोचले. याप्रकरणी अभिनेत्रीचा मुलगा सागर याचे दोन मित्र अनुज व सनी यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक अहवालानुसार सागरचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

मात्र सपनाने हे दावे नाकारले असून तिच्या मुलाचा खून झाला आहे, असा आरोप तिने केला आहे. सपना सिंहने संशयितांवर तिच्या मुलाला विष पाजल्याचा आरोप केला. तसेच त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळले होते, असा दावा देखील अभिनेत्रीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचा मुलगा हा इयत्ता आठवीत शिकत होता. तो बरेलीच्या आनंद विहार कॉलनीत त्याचे मामा ओम प्रकाश यांच्याबरोबर राहत होता. (Entertainment News)

News Title – Entertainment News Actress Sapna Singh son found dead in UP

महत्त्वाच्या बातम्या-

लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, ‘त्या’ निकषांबाबत महत्वाची माहिती समोर

“पैशांच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे…” नाना पटोले स्पष्टच बोलले

भाजपचा मेगा प्लॅन तयार! पुढील टार्गेट पुणे महानगरपालिका

मंत्रीमंडळ विस्तारापूर्वीच दोन्ही पवारांची दिल्लीत भेट, नव्या राजकीय समिकरणांची नांदी?

सर्वात मोठी बातमी! अजित पवार शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीत मोठी खलबतं?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .