Entertainment News | 2024 हे वर्ष संपायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. या वर्षी अनेक मोठ्या घटना घडल्या. सिनेविश्वाबद्दल बोलायचे झाल्यास यंदा अनेक नवीन चित्रपट गाजले. अनेकांनी कमबॅक देखील केलं. तर, अनेक कलाकारांचे संसार देखील मोडले. काही कलाकारांचे वर्षांपासून असलेले नाते लग्न होण्यापूर्वीच तुटून गेले. तर, काहींचा संसार उद्ध्वस्त झाला. या वर्षात कोणत्या कलाकारांचे घटस्फोट झाले ते पाहुयात. (Entertainment News )
‘या’ कलाकारांचा झाला घटस्फोट
ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या लेकीचा आणि प्रसिद्ध अभिनेता धनुष यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. दोघेही कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. त्यांनी 18 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यांचा हा अर्ज काही दिवसांपूर्वीच मंजूर झाला असून धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतचा विभक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ए.आर. रेहमान आणि सायरा बानू : प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांचा देखील घटस्फोट झाला आहे. यासंदर्भात ए आर रेहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर अधिकृत घोषणा देखील केली होती. लग्नाच्या 29 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (Entertainment News )
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत तिसऱ्यांदा लग्न केलं. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिल्याचं म्हटलं गेलं. यावर्षी जानेवारी महिन्यात दोघेही वेगळे झाले.
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टँकोव्हिच : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांनी देखील या जुलै महिन्यात घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. 2018 मध्ये हार्दिक आणि नताशाच्या (Hardik Pandya and Natasha divorce)पहिल्या भेटीनंतर त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. पुढे हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये साखरपुडा करत सर्वांनाच धक्का दिला. जुलै 2020 मध्ये त्यांच्या आयुष्यात अगस्त्य (त्यांचा मुलगा) आला. हार्दिक आणि नताशा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केले. मात्र, यावर्षी त्यांनी घटस्फोट घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. (Entertainment News )
ईशा देओल आणि भरत तख्तानी : अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लाडकी लेक ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा देखील याचवर्षी घटस्फोट झाला. ईशा आणि भरत यांनी 29 जून 2012 मध्ये इस्कॉन मंदिरात लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलीदेखील आहेत.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर : 2019 मध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली होती. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. दोघांनीही यावर्षी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (Entertainment News )
News Title- Entertainment News These actors got divorced in 2024
महत्त्वाच्या बातम्या –
शिंदेंना गृहखात्यावर पाणी सोडावं लागणार?, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
अजितदादांच्या ‘त्या’ गोष्टीवरून तळपायाची आग मस्तकात गेली; अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
उद्या मोठी घडामोड घडणार; महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार?
राजकीय महाभूकंप… महाविकास आघाडीतून ‘हा’ पक्ष बाहेर पडला
…म्हणून मविआच्या आमदारांनी शपथ घेतली नाही, आदित्य ठाकरेंनी केला खुलासा