सिंगल लोकांनी ‘या’ वेबसिरीज पाहूच नयेत!

Entertainment | ओटीटी प्लॅटफाॅर्मवर अनेक थ्रीलर, इमोशनल शिवाय रोमँटिक सिरीज आपल्याला पहायला मिळतात. जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत किंवा गर्लफ्रेंडसोबत प्लॅन करत असाल तर त्यावेळेस काही रोमँटिक वेबसिरीज सुद्धा पहा. काही रोमँटिक वेब सिरीज आणि चित्रपट तुमचं हृदय पिळवटून टाकतील. आज आम्ही तुम्हाला काही वेब रोमँटीक सीरीजची नावं सांगणार आहोत ज्या तुम्ही OTT वर अगदी मोफत पाहू शकता.

द लस्ट स्टोरीज-

द लस्ट स्टोरीज ही सर्वात बोल्ड (Entertainment) चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटात आजचे अनेक मोठे कलाकार असतील तर. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर, दिव्या दत्ता यांसारखे कलाकार दिसणार आहेत. ओटीटीवर या सिरीजची जोरदार चर्चा रंगली होती. आज सुद्धा ही सिरीज ओटीटीवर तूफान गाजते.

इश्क एक्सप्रेस-

इश्क एक्सप्रेस Amazon वर गाजलेले ही सिरीज आजून सुद्धा लोकांचं मनोरंजन (Entertainment) करत असते. या सिरीजमध्ये ट्रेनमध्ये भेटणाऱ्या दोन प्रवाशांची कथा मांडली आहे. इश्क एक्सप्रेस ही एक छान प्रेमकथा आहे जी सर्व जोडप्यांनी आवर्जून पहावी. ही मालिका तुम्ही Amazon Mini TV वर पूर्णपणे मोफत पाहू शकता.

राफ्ता राफ्ता-

राफ्ता राफ्ताची कथा एका नवविवाहित जोडप्याभोवती फिरते जे जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहे. या कथेत प्रेमाव्यतिरिक्त भांडणेही पाहायला मिळतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हा चित्रपट जरूर पहा. हा चित्रपट तुम्ही Amazon Mini TV वर नक्कीच पाहू शकता. सृष्टी गांगुली, भुवन बाम, राकेश बेडी यांनी या सिरीजमध्ये मुख्य भूमीका साकरल्या आहेत.

बेकाबू-

ही एकता कपूर निर्मित बोल्ड वेब सीरिज आहे. या मालिकेत मधु स्नेहा उपाध्याय आणि प्रिया बॅनर्जी यांच्यासह अनेक कलाकार आहेत. मालिकेच्या प्रत्येक भागात खूप बोल्ड सीन्स आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ही वेब सिरीज पाहू शकत नाही. ही मालिका तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पाहू शकता. तुम्ही ते Alt Balaji ॲपवर पाहू शकता.

News Title : entertainment web series to watch by couples

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माच्या मुलाचं नाव जाहीर!

अजितदादांच टेन्शन वाढणार? युगेंद्र पवारांनी उचललं मोठं पाऊल

‘निवडणुकीसाठीच योजना…’; लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवारांची जाहीर कबुली

महागाईचा अजून एक धक्का! एसटी प्रवास ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार

ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार? ‘या’ बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य