बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक-दोन कोरोनाबाधित आढळले तर संपूर्ण कार्यालय बंद करण्याची गरज नाही”

नवी दिल्ली | लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात अनेक कार्यालये खुली करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी नवी नियमावली जाहीर केली.

जर एखाद्या कार्यालयात किंवा कार्यालयाच्या इमारतीत एक-दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर संबंधित कार्यालय पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नाही. संबंधित कार्यालयाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर तिथे पुन्हा काम सुरु करता येईल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

जर एखादे कार्यालय असलेल्या इमारतीत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून आले तर ती इमारत पुढील 48 तासांसाठी बंद ठेवावी. त्यानंतर तिची निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरु करावी, असं केंद्राने सांगितल्याचं कळतंय.

दरम्यान, जर कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये तापाची लक्षणं आढळून आली तर त्याने कार्यालयात येऊ नये, डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. जर वैद्यकीय तापसणीनंतर त्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले तर त्याने आपल्या कार्यालयाच्या व्यवस्थापनाला तत्काळ याची माहिती द्यावी, असं केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक; मुख्यमंत्र्यांची माहिती

कोरोनासोबत जगायला शिका, यावर सध्या काहीही औषध नाही- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

ग्रामीण भागात मजुरांना काम द्या, अन्यथा काय करायचे ते सांगतो – प्रकाश आंबेडकर

…म्हणून मी नरेंद्र मोदी यांना राम मानते; रामायणातील सीतेचा खुलासा

विश्वासघाताने बनलेल्या सरकारबाबत जनतेत विश्वास तरी कसा निर्माण व्हावा? भाजपची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More