नागपूर महाराष्ट्र

परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी- नितीन गडकरी

नागपूर | परप्रांतीय कामगारांवर महाराष्ट्रातील उद्योग अवलंबून असल्याचं निर्माण केल जात असलेलं चित्र खरं नाही. असे कामगार केवळ 10 ते 12 टक्के आहेत. कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांना घ्यावी लागेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गडकरींनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावेळी ते बोलत होते.

कोरोनामुळे सर्वच उद्योग, व्यवसायांवर व अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक देशात आणणे, आपले तंत्रज्ञान अधिक अद्ययावत करणे आणि जनतेची क्रयशक्ती वाढवणे हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या पदाधिकाऱ्यांनी या दृष्टीने विचार करावा. उद्योजकांनी उद्योग हळूहळू सुरू करावेत, असं गडकरी म्हणाले आहेत.

आम्हाला कोरोनासारख्या आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत करायचं आहे. त्यामुळे निराश होऊन चालणार नाही. कोरोना संकट आणि आर्थिक लढाई एकाच वेळी लढायची आहे. जोपर्यंत करोनावर औषध निघत नाही, तोपर्यंत कोरोनाचा प्रसार होणार नाही, या पद्धतीने नियम पाळून कामाला लागावे लागेल, असं नितीन गडकरी म्हणालेत.

ट्रेंडिंग बातम्या-

मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे

“जवळपास 28 हजार रुग्ण बरे झालेत, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होतं”

महत्वाच्या बातम्या-

हम होंगे कामयाब, राज्याचा डबलिंग रेट ११.७ वरून १७.५… पाहा किती रूग्ण वाढले, किती रूग्णांना डिस्चार्ज

कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली ‘ही’ कळकळीची विनंती!

अखेर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार मार्क

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या