भजनी मंडळातील दलिताला मंदिर प्रवेश नाकारला!

देवानंद कांबळे

सांगली |  भजनी मंडळातील दलिताला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आलाय. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील शिरगावमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 

शिरगावच्या गोवर्धन खुरासने यांनी गावातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पारायण आयोजित केलं होतं. यावेळी बोलावलेल्या भजनी मंडळातील देवानंद कांबळे यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. आम्ही दलितांना मंदिरात प्रवेश देत नाही, नाहीतर ते डोईजड होतील, असं गोवर्धन यांनी म्हटल्याचा आरोप देवानंद यांनी केलाय.

दरम्यान, देवानंद कांबळे यांनी याप्रकरणी वांगी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. महाराष्ट्राची मान शरमेनं झुकवणाऱ्या या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जातोय.