बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंग्लंडच्या फलंदाजांची झोप उडणार; भारतीय संघात ‘या’ नव्या डावखुऱ्या गोलंदाजाची एन्ट्री

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने शुक्रवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 20 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघात 23 वर्षीय अर्झन नाग्वास्वाल्लाच्या निवडीनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

बडोदा विरुद्धच्या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्झन नाग्वास्वाल्लाने आतापर्यंत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. 2018 साली गुजरातच्या वरिष्ठ संघात त्याला स्थान दिलं गेलं. त्याने राजस्थानविरुद्ध हा पदार्पणाचा सामना खेळताना 8 षटकात 34 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. अर्झनने आत्तापर्यंत 16 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने 22.53 सरासरीने 62 विकेट्स घेतल्या आहेत. तर 15 टी-20 क्रिकेट सामन्यांत 16.38 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या आहेत.

कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघ जाहीर झाला आहे. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा या खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे.

दरम्यान, इंग्लंड दौऱ्यासाठी राखीव खेळाडूंमध्ये अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्झन नाग्वास्वाल्ला या खेळाडूंचा समावेश आहे. पण मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा आणि उमेश यादव यांच्या फिटनेस बाबतीत आद्याप कोणतीही माहिती दिली गेली नाही.

थोडक्यात बातम्या-

मंगळावर अज्ञात हेलिकॉप्टरचा वावर? नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद, पाहा व्हिडीओ

पुण्यात देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर’ उभारणार; पुणे महापालिका अलर्ट मोडवर

मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन

कोरोना रुग्णांना होतोय ‘म्युकर मायकोसिस’ हा गंभीर आजार; 20 जणांचे डोळे निकामी

पुण्यात भितीचं वातावरण तयार होऊ नये म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More