श्रद्धा वालकर प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री?

मुंबई | आफताब पुनावाला याच्यावर त्याची लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा खून केल्याचा आरोप आहे. श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हिची गळा दाबून हत्या केल्यानंतर आफताब याने तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे केले होते. त्यानेतर हेच तुकडे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत हत्या केल्याचे पुरावे मिटवले होते.

मे महिन्यात झालेल्या या हत्याकांड प्रकरणानंतर थेट सहा महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात आफताब याला अटक करण्यात आलीये.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे. दिवसेंदिवस या हत्याकांड प्रकरणाशी संबंधित नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आहे. म्हणजे या व्यक्तीनेच आफताब पुनावाला याला हत्येचे पुरावे मिटवून टाकण्यासाठी मदत केली असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय.

तिसऱ्या व्यक्तीचं नाव या हत्याकांडाशी जोडलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीने आफताब पुनावाला याला मदत का केली? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-