बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि मंत्रिमंडळातील मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वत: आदित्य ठाकरेंनी ट्विट करत माहिती दिली आहे.

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहेे. त्यासोबतच माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असं आवाहनही आदित्या ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे.

आदित्य ठाकरेंआधी पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत गुलाबराव पाटलांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली होती. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, विरोधी पक्षातील नेते गिरीष महाजन यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पुन्हा आपलं डोकं वर काढू लागला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! नवरा रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत असल्यामुळे नाराज होऊन बायकोने….

ए दिल है मुश्किल! इम्रान खान यांनी घेतली चीनची कोरोना लस अन् दोन दिवसातच झाला कोराना

“सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नाहीत, ‘यूपीए’ला सक्षम करण्यासाठी शरद पवारांनी नेतृत्व करावं”

“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षापासून विकास डाऊन”

धक्कादायक! कोरोनाची लक्षणे दिसल्याने थेट तापी नदीत उडी घेत शिक्षकाची आत्महत्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More