बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोकरदारांसाठी गुड न्यूज; एकाच वेळी खात्यावर मोठी रक्कम जमा

मुंबई | नोकरदार आपली नोकरी चालु असताना एक विशिष्ठ रक्कम आपल्या पीएफ खात्यात जमा करत असतात. या मागे त्यांचा उद्देश हाच असतो की निवृत्तीनंतर ही रक्कम आपल्या कामाला येईल. कर्मचाऱ्यांच्या या रकमेवर इपीएफओ हे नियमावली आखत आणि योजना बनवत असतं. तसेच जमा रकमेवरील व्याज वाटप करतं.

मागील काही दिवसांपासुन हे व्याज कर्मचाऱ्यांना मिळालं नाही. हे व्याज वेळोवेळी कर्मचाऱ्यांना मिळत असतं पण अजुन ते खात्यावर जमा नाही झालं. म्हणून सर्व नोकरदार चिंता करत होते पण त्यांची ही चिंता आता लवकरच दुर होणार आहे. कारण या वर्षीचं व्याज कर्मचाऱ्यांच्या खात्यात इपीएफओ जमा करणार आहे.

एका पीएफ खातेधारकाने ट्विटरवर ईपीएफओला टॅग करुन ईपीएफओकडून पीएफ व्याज दर कधीपर्यंत मिळेल असा प्रश्न विचारला होता. त्यावर ईपीएफओने प्रतिसाद देत सर्वांना एक रकमी व्याज मिळेल आणि ते पीएफ खात्यात जमा होईल अशी माहिती दिली.

इपीएफओ कडुन 8.5 टक्के व्याज दराने रक्कम जमा होईल. याचा फायदा थेट 6 कोटी ग्राहकांना होणार आहे. हे व्याज जुलै अखेर पर्यंत जमा होणं अपेक्षित होतं. दोन हफ्त्यात रक्कम जमा होईल असं सांगण्यात आलं होतं पण तसं झालं नाही.

थोडक्यात बातम्या

41 वर्षांनंतर हाॅकी संघानं रचला इतिहास; रोमांचक सामन्यात भारताचा दणदणीत विजय

मी चुकीचा होतो तर, केंद्रावर ही वेळ का आली?- अशोक चव्हाण

“चित्रा वाघ यांना शिवसेनेत यायचं होतं पण शिवसेनेनं प्रवेश नाकारला, त्यामुळे त्या…”

‘या’ विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात 1000 पटीनं अधिक व्हायरस, संशोधनातून नवी माहिती समोर

“मनसे असो वा राष्ट्रवादी, भाजप युती करणारच नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More