EPFO New Changes | कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यासंदर्भात एक नवीन नियम लागू केला आहे. ज्याचा परिणाम हा 7 कोटी खातेधारकांवर होणार आहे. हा बदल (EPFO New Changes) सर्व पीएफ खातेदारांसाठी लागू असणार आहे.
EPFO ने वैयक्तीक माहिती , नाव, जन्म तारखेत सुधारणा करण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती (SOP)आखली आहे. त्यामुळे पीएफधारकांना त्यांचे प्रोफाइल अपडेट करण्यासाठी आता एसओपी व्हर्जन 3.0 चा वापर करावा लागेल.
ईपीएफओकडून नवीन गाइडलाइन
याचबरोबर UAN प्रोफाइलमध्ये अपडेट किंवा बदल करण्यासाठी आता कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. खातेधारकांच्या प्रोफाईलमध्ये बऱ्याचदा चुका होत असतात. या अडचणी डेटा अपडेट न झाल्यामुळे होत असतात.
आता नवीन गाइडलाइननुसार, EPFO ने प्रोफाइलमधील बदल करण्यासाठी दोन श्रेणी तयार केल्या आहेत. म्हणजेच किरकोळ बदल एका अर्जासह दोन आवश्यक कागदपत्रे (EPFO New Changes) दिल्यावर करता येतील. तर, मोठे बदल करण्यासाठी किमान तीन आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
खातेमधील चुका दुरुस्त करण्यासाठी नवीन बदल
आधारशी संबंधित बदल करायचे असतील तर आधार कार्ड किंवा सक्रिय मोबाइल नंबरशी लिंक केलेले ई-आधार कार्ड सहाय्यक दस्तऐवज म्हणून बघितले जाईल. मात्र, यासाठी एक अट आहे. हे बदल वर्तमान नियुक्तीच्या खात्यातच होऊ शकतात. जुन्या नियुक्तीधारकाच्या खात्यात बदल होणार (EPFO New Changes) नाही.
News Title – EPFO New Changes
महत्त्वाच्या बातम्या-
“अमिताभ यांनी ऐश्वर्याला कधीच सून मानले नाही”; जया बच्चन यांचा मोठा खुलासा
दिपीकाने दिला बाळाला जन्म?; सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल
बच्चन कुटुंबात अजूनही कोल्ड वॉर सुरूच?, अमिताभ बच्चन यांच्या पोस्ट वेधलं लक्ष
पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरसचा धोका वाढला, रूग्णसंख्या 52 वर
“सरकार आता ‘माझा लाडका घोडा’ योजना आणतंय, मग कुत्रे..”; जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं