EPFO PF account | खाजगी क्षेत्रात (Private Sector) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (Employees’ Provident Fund Organisation – EPFO) सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. EPFO ने कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (Provident Fund – PF) खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यासंदर्भात EPFO ने एक परिपत्रक (Circular) जारी केले आहे. (EPFO PF account)
कंपनीला ऑनलाइन अर्ज पाठवण्याची गरज नाही
EPFO च्या परिपत्रकानुसार, पीएफ खाते ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या किंवा नवीन कंपनीला ऑनलाइन अर्ज पाठवण्याची गरज असणार नाही. आता, पीएफधारक (PF Account Holder) स्वतःच खाते ट्रान्सफरसाठी क्लेम (Claim) करू शकतात. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून (Salary) मूळ पगाराच्या (Basic Salary) १२% रक्कम ईपीएफ (EPF) खात्यात जाते. तसेच, इतकीच रक्कम कंपनीकडून जमा केली जाते. कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या जमा होणाऱ्या पीएफमधील ८.३३% रक्कम पेन्शनमध्ये (Pension) तर ३.६७% रक्कम पीएफमध्ये जाते.
नवीन परिपत्रक जारी
१५ जानेवारी २०२५ रोजी EPFO ने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, जुन्या कंपनीने नवीन कंपनीकडे ऑनलाइन अर्ज पाठवण्याची गरज नाही. आता कर्मचाऱ्यांना अधिक स्वातंत्र्य (Freedom) आणि सोय (Convenience) मिळणार आहे. (EPFO PF account)
कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर निर्णय
हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. यामुळे पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद (Fast) होईल. कर्मचाऱ्यांना आता कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.