बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईपीएफओची मोठी कारवाई! पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील

बीड | राजकीय वर्तुळात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना ईपीएफओने मोठी कारवाई केली आहे. ईपीएफओने परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील केलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या साखर कारखान्याच्या चेअरमन आहेत. यामुळे पंकजा मुंडेंसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी त्यांच्या खात्यात जमा केला नव्हता. पीएफची जवळपास 1 कोटी 46 लाख रुपये थकबाकी होती. तसेच या कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकीत आहेत. यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांनी ही कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तलवारे यांच्या आदेशानुसार प्रवर्तन अधिकारी एस आर वानखेडे यांनी ही कारवाई पार पाडली आहे. पीएफच्या थकबाकी पोटीचे 92 लाख रुपये करखान्याकडून वसूल करण्यात आले आहेत.

पीएफ थकबाकीदारांच्या विरोधात ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी ईपीएफओच्या या कारवाईवर समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी अद्याप या करवाईवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

थोडक्यात बातम्या –

‘मला तैमूरचं डायपर देखील बदलता येत नव्हतं’; करीनाने सांगितला आईपणातला अनुभव

‘गोंधळ आघाडीतला नवा तमाशा’; अतुल भातखळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश; निकाल पाहण्यास विद्यार्थ्यांना अडचणी

‘महाराष्ट्राची रूग्णवाढ देशासाठी गंभीर बाब’; मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली चिंता

“काँग्रेस नेते एचके पाटील काय म्हणतात त्यालाच आम्ही महत्त्व देतो”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More