बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कॅशियरसोबत फ्लर्टिंग करायचं नाही’; ‘या’ मेड इन पुणे पाटीनं गाजवलं सोशल मीडिया

पुणे । महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणारं पुणे हे जगाच्या पाठीवर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. याशिवाय पुण्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे पुणेरी पाट्या. या पुणेरी पाट्या कमी शब्दांत उपरोधिक संदेश देत असतात. असाच काहीसा संदेश देणाऱ्या पाट्या पुण्यातील बालेवाडी परिसरातील ईराणी कॅफेमध्ये दिसून आल्या. या पाटीद्वारे ग्राहकांना कॅफेमध्ये पाळायच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कॅफेमध्ये लॅपटॉप वापरायचा नाही, धुम्रपान करायचं नाही, उधारी बंद, बाहेरील पदार्थ चालणार नाहीत, जोरात बोलायचं नाही, सौदेबाजी करणं, काडेपेटी वापरायची नाही, जुगार खेळण्याविषयी चर्चा नाही, कंगवा वापलेला चालणार नाही, दात घासणं नाही, खुर्चीवर पाय ठेवायचे नाही, झोपलेलं चालणार नाही, पळून जायचं नाही, मोबाईलवर गेम्स खेळायच्या नाहीत, फूड कूपन्स नाहीत, कॅशियरबरोबर फ्लर्टिंग करायचं नाही, अशा अनेक सूचना या पाटीवर लिहिल्या आहेत.

पुण्यात ठिकठिकाणी अनेक पाट्या वारंवार बघायला मिळत असतात. या पाट्यांमधून कमी शब्दांमध्ये समोरच्या माणसाला खोचक सल्ला देण्याची कला पुणेकरांना जन्मत: प्राप्त असते ही गोष्ट पुन्हा एकहा सिद्ध झाली आहे. आता बदलत्या काळात या पुणेरी पाट्यांची कला नामशेष होताना दिसत आहे. असं असताना ईराणी कॅफेने राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, या पुणेकरांच्या स्थायी स्वभावातून तयार होणाऱ्या या पुणेरी पाट्यांनी जगात एक मानाचं स्थान प्राप्त केलं आहे. याच पाट्यांचं प्रदर्शन अनेकदा पुण्यात भरवलं जातं.

थोडक्यात बातम्या-

“आम्ही आमच्या घरालाही मोदींचं नाव देऊ, तुमच्या पोटात का दुखतंय”

साेशल मीडिया, ओटीटी, न्यूज पाेर्टल्सवर सरकारची असणार करडी नजर; वाचा नवी नियमावली

अभिमानास्पद! काश्मीर खोऱ्यात जिल्हाधिकारीपदी मराठामोळे संतोष सुखदेवे

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूंचा काँग्रेसला रामराम; ‘या’ पक्षात केला प्रवेश

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More