EPS Pensioners l कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 जानेवारी 2025 पासून EPS पेन्शनधारक देशाच्या कोणत्याही बँकेतून व कोणत्याही शाखेतून पेन्शनची रक्कम मागधी सहजरित्या काढू शकतात. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे देशातील सुमारे 78 लाख EPS पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
78 लाख EPS पेन्शनधारकांना होणार लाभ :
एका प्रसिद्धीपत्रकात या निर्णयाची माहिती देताना श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की, श्रम आणि रोजगार मंत्री आणि केंद्रीय विश्वस्त मंडळ, ईपीएफचे अध्यक्ष मनसुख मांडविया यांनी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 साठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टमला मंजुरी दिली आहे.
केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणालीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली तयार केल्यामुळे, भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनधारकांना पेन्शन काढता येईल. त्यामुळे EPFO च्या 78 लाख EPS पेन्शनधारकांना केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टमचा फायदा होणार आहे.
EPS Pensioners l पेन्शनधारकांच्या समस्या दूर होणार :
या ऐतिहासिक निर्णयावर कामगार आणि रोजगार मंत्री म्हणाले, सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमला मंजूरी हा ईपीएफओच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन दिल्यास पेन्शनधारकांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.
केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम देशात पेन्शन वितरणास मदत करेल आणि यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी, पेन्शनधारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर किंवा बँका किंवा शाखा बदलल्यानंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करावी लागत होती. मात्र आता निवृत्तीनंतर आपल्या गावी जाणाऱ्या अशा पेन्शनधारकांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे.
News Title – Employees Pension Scheme 1995 pensioners can get money from any bank
महत्त्वाच्या बातम्या-
दुलिप ट्रॉफी स्पर्धेला सुरवात; जाणून घ्या स्पर्धेची A टू Z माहिती
गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट किंमती
आज ‘या’ 5 राशींवर राहील भगवान विष्णूची कृपा, धनसंपत्तीत होईल वाढ
सावधान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार
शिल्पकार जयदीप आपटे सापडला, अटक होताच वकिलांकडून धक्कादायक गौप्यस्फोट