घटस्फोटानंतर ईशा देओलची पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात; म्हणाली..

Esha Deol | अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लाडकी लेक ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी घटस्फोट घेतला आहे. आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता एकत्र नसलो तरी आमच्या दोन मुलांचं भविष्य आमच्यासाठी सर्वात महत्वाचं असल्याचं म्हणत ईशा आणि भरत वेगळे झाले.

घटस्फोटानंतर ईशा दोन्ही मुलींचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. अशातच तिने एक मोठी घोषणा केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना ईशाने मोठं वक्तव्य केलंय. घटस्फोट झाल्यानंतर ईशाने पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

काय म्हणाली ईशा?

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ईशा म्हणाली की, ‘मी सध्या माझ्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाची घोषणा लवकरच करण्यात येईल. मी आता खूप आनंदी आहे… सध्या एवढंच सांगेल…’, असं ईशा (Esha Deol) म्हणाली. तिच्या या विधानातून ती पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जातंय.

ईशा देओलने वृक्षारोपण मोहीमेत हजेरी लावली होती.‘झाडे लावणे ही एक अद्भुत भावना आहे कारण ती आपल्यासाठी नाही तर आपल्या भावी पिढ्यांसाठी आहे. नुकताच, आम्ही मुंबईत एक भयानक वादळ पाहिलं. यापूर्वी दुबईला मुसळधार पावसामुळे पुराचा सामना करावा लागला होता. हे सर्व निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी दिलेले अव्हान आहे.’, असं या कार्यक्रमात ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

ईशा देओलचं फिल्मी करीअर

ईशा देओल (Esha Deol) हिने बॉलिवूडनंतर ओटीटीवर पदार्पण केलं आहे. अभिनेता सुनील शेट्टी याच्यासोबत ती ‘हंटर टूटेगा नही तोडेगा’ या सीरिजमध्ये दिसून आली होती.2002 मध्ये ‘कोई मेरे दिल से पूछे’ या रोमँटिक सिनेमाद्वारे ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत आफताब शिवदासानी दिसला होता.

ईशाने ‘ना तुम जानो ना हम’, ‘क्या दिल ने कहा’, ‘कुछ तो है’, ‘दस’, ‘नो एंट्री’, ‘शादी नंबर 1’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. आता ती पुन्हा कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

News Title-  Esha Deol Ready To Comeback On Screen After Divorce

महत्त्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांसोबत पावसाची थट्टा; ‘या’ भागांना अवकाळीचा फटका बसणार

ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या दर

बापरे! 72 तासांत 8 किलो सोने, 14 कोटी रोकडसह 170 कोटींची मालमत्ता जप्त; कोण आहे मालक

मोदींपेक्षाही कंगना रनौत श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून हैराण व्हाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती? आकडेवारी एकूण व्हाल थक्क