Esha Malviya | बिग बॉस 17 मध्ये झळकलेली अभिनेत्री ईशा मालवीय ही तिच्या एका खुलाश्यामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस मध्ये ईशा तिच्या अफेअर्समुळे चर्चेत आली होती. ईशा मालवीयचा बॉयफ्रेंड समर्थ हा तिला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसमध्ये पोहचला होता. त्यातच तिचा एक्स देखील बिग बॉसमध्ये सहभागी झाला. यामुळे ईशा सतत चर्चेत राहिली.
ईशा मालवीय आणि समर्थ यांचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले. बिग बॉसच्या घरात ईशा मालवीय (Esha Malviya) हिची अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यासोबत देखील खास मैत्री बघायला मिळाली होती. मात्र, तिने अंकिताबद्दलही मोठं भाष्य करत आपल्या खासगी आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय.
ईशा मालवीयचा धक्कादायक खुलासा
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर ईशा मोठ्या पडद्यावर दिसली नाही. उडारिया मालिकेतून ईशाला खरी ओळख मिळाली. मात्र, आता तिला बऱ्याच गोष्टींचा पश्चाताप होताना दिसत आहे. याबद्दलच ईशा मालवीय हिने स्वतः खुलासा केलाय. एका मुलाखतीमध्ये ईशाने मोठे खुलासे केले आहेत.
“मी खूप जास्त स्वार्थी लोकांना भेटले आणि त्यांच्यासोबत मैत्री केली, आता मला त्या गोष्टींचा पश्चाताप होत आहे. त्या लोकांनी फक्त आणि फक्त माझा वापर केला. मी ज्या लोकांसोबत मैत्री केली त्यांनी माझा वापर केला. कोणीच माझी इज्जत ठेवली नाही. समर्थ आणि अभिषेक तर माझे एक्स आहेत. पण, बाकी लोकांसोबत मी मनापासून मैत्री केली होती.”, असं ईशा (Esha Malviya ) म्हणाली आहे.
अंकिता लोखंडेबाबत केलं मोठं भाष्य
अंकिता लोखंडेबाबतही ईशाने मोठं वक्तव्य केलंय. “मी अंकिता आणि विकी जैन यांना माझे चांगले मित्र समजत होते. पण, आता मला वाटते की, हीच माझी सर्वात मोठी चूक होती. मी माझ्या काही गोष्टी विचार करून सांगायला हव्या होत्या.”, असं ईशा म्हणाली आहे. तिचं हे विधान आता चर्चेत आलंय.
View this post on Instagram
दरम्यान, बीग बॉसमध्ये ईशा आणि अंकिता यांच्यात चांगला बॉण्ड दिसून आला होता. त्या दोघी नेहमी सोबत दिसायच्या. मात्र, नुकताच ईशाने केलेल्या या खुलाश्यामुळे या दोघींमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. ईशा मालवीय आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये काहीतरी मोठा वाद झालाय. यामुळेच ईशाला (Esha Malviya) पश्चाताप होत असल्याचे म्हटले जात आहे.
News Title – Esha Malviya Serious Allegations
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पुणे शहरात उच्चशिक्षित डॉक्टरने कोयत्याने केला हल्ला
‘लाडकी बहीण योजने’साठी आता मोबाइलवरून करा अर्ज; ‘या’ स्टेप्स करा फॉलो
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट; पुढील दोन दिवस..