बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोमय्यांच्या अडचणी वाढल्या??, 72 तासांनंतरही माफी न मागितल्याने परबांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर बेकायदेशीररित्या हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच परब यांनी परिवहन विभागात बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा खळबळजनक आरोपही सोमय्यांनी केला होता. त्यानंतर अनिल परब यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर किरीट सोमय्यांनी 72 तासात जाहीररित्या माफी मागावी अन्यथा 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं होतं.

अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना त्यांच्या वकील सुषमा सिंग यांच्यामार्फत माफीनाम्यासाठी नोटीस बजावली होती. आज 72 तास उलटून गेले तरी सोमय्यांनी परब यांची जाहीररित्या माफी मागितली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात अनिल परब यांनी 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा सोमय्यांवर केला आहे. परब यांनी याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्यासाठी सुचित केले होते. परंतु सोमय्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्यांच्या विरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रूपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे, असं अनिल परब त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात.

दरम्यान, अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना 72 तासात माफी मागण्यासाठी नोटीस दिल्यानंतर, परब यांच्या नोटीशीला आपण भीक घालत नसल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेला वाटतं की मी फक्त त्यांचेच घोटाळे बाहेर काढत आहे, पण मी राज्यातील एका बड्या काँग्रेस मंत्र्याचा देखील घोटाळा बाहेर काढणार आहे, असं म्हणाले होते. आता परब यांनी केलेल्या 100 कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर किरीट सोमय्या काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं आता औतसुख्याचं ठरणार आहे.

 

वाचा ट्विट – 

 

 

 

थोडक्यात बातम्या – 

“अनंत गीते काही चुकीचं बोलले नाहीत, ही आघाडी…”; नाना पटोले यांचं मोठ वक्तव्य

‘…तर लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करतो’; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

“शरद पवारांमुळे, अजित पवारांना राजकारणात संधी मिळाली मात्र त्यांनी घाण केली”

“शरद पवारांवर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार”

“अनंत गीतेंचं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारीत आहे”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More