बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारिरीक संबंध होते”

मुंबई | बाॅलिवूडमधील प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग नेहमीच त्याच्या अनोख्या गाण्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असलेला पाहायला मिळतो. मात्र सध्या हनी सिंग एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. हनी सिंग सध्या त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

यो यो हनी सिंग विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची पत्नी शालिनी तलवार हिनं हनी सिंगच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे. शालिनीनं दाखल केलेल्या याचिकेत तिनं पती हनी सिंगचे लग्नानंतरही अनेक महिलांशी शरीरसंबंध असल्याचा असा दावा केला आहे.

शालिनीनं याचिकेमध्ये लैंगिक हिंसा, मानसिक छळ, घरगुती हिंसा आणि तिच्यासोबत आर्थिक फसवणुकीचाही आरोप केला आहे. त्याचबरोबर शालिनी हनी सिंगबरोबरच त्याच्या आई-वडिलांवर देखील आरोप केले आहेत.

दरम्यान, शालिनी तलवार हनी सिंगविरुद्ध तक्रारी नोंदवल्यानंतर दिल्लीतील तीस हजारी सत्र न्यायालयाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे. पाठवण्यात आलेल्या नोटीशीला 28 ऑगस्टपूर्वी उत्तर देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

थोडक्यात बातम्या –

“पवार कुटुंब किती लबाड आहे हे राज्याला चांगलं माहित आहे”

सोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकीनी लुक पाहून सर्वच हैराण, सोनालीचे मालदीवमधले फोटो व्हायरल

धक्कादायक! पुरुषांपेक्षा जास्त ‘या’ स्त्रियांना पाॅर्न पाहण्यात अधिक रस, अभ्यासातून झाला ‘हा’ खुलासा

ऑलिम्पिकमध्ये रंगणार भारत पाकिस्तान सामना; ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर भारताची धूरा

पोस्ट ऑफीसच्या किसान विकास पत्र या योजनेतुन दाम दुप्पट करण्याची सुवर्णसंधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More