बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीचे 2 डोस घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह पण पूर्णपणे ठणठणीत- मुख्यमंत्री अशोक गहलोत

जयपूर | राजस्थानमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाची भर पडली आहे. अशोक गहलोत यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी लिहिलं की, ‘माझी कोरोनाची टेस्ट केली असता माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसून आलेली नाहीत. मी पूर्णपणे ठीक आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करताना मी स्वतःला आयसोलेट केलं असून असच काम सुरू ठेवणार आहे’. महत्वाची बाब म्हणजे, गहलोत यांच्या पत्नी सुनिता गहलोत यांचा अहवाल एका दिवसापूर्वीच पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टेस्ट करून घेतली.

विशेष म्हणजे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस आधीच घेतले आहेत. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात लसीचा पहिला डोस आणि मार्च महिन्यात दुसरा डोस घेतला होता. कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग होणारच नाही याची शाश्वती नाही. मात्र, निश्चितच अशा व्यक्तींना कोरोना झाल्यास धोका कमी असतो आणि बरे होण्याची क्षमता देखील वाढते असं तज्ञ्जांचं म्हणणं आहे. त्यामुळेच, गहलोत यांना कोरोना झाल्यानंतरही गंभीर लक्षणं नाहीत.

दरम्यान, राजस्थानात कोरोनामुळं होणारा मृत्यू चिंतेचा विषय बनत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यामध्ये मृतांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यांचा रिपोर्ट पाहिल्यास मृत्यूचं प्रमाण 3 पटीनं वाढल्याचं दिसून आलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या

…अन् कोरोना रुग्णाचं 5 लाखांचं बील आलं अडीच लाखांवर; खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट उघड

‘या’ तारखेनंतर 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा सरकारचा विचार- किशोरी पेडणेकर

राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तात्याराव लहानेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

ह्दयद्रावक घटना! बापाच्या कष्टाचं मुलानं चीज केलं इंजिनिअर झाला, लग्नही ठरलं अन्…

‘धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी’; कोरोनाने मृत्यू झालेल्या भाजप आमदाराच्या मुलाने सरकारला सुनावलं

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More