बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  आरोप ग्रामपंचायत निवडणुक तोंडावर असताना करण्यात आले होते. याचा परिणाम परळीतील ग्रामपंचायतींवर होणार का, याची चर्चा रंगली होती. मात्र सोमवारी लागलेल्या निकालाचा मतदारांवर काहीच परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं आहे.

परळीतील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. त्यामध्ये 6 ग्रामपंचायत पैकी पाच जागेवर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलनं दणदणीत विजय मिळविला आहे.

या विजयावर धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे.

ते म्हणाले की, “परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणूका झालेल्या 12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन, गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा, खूप खूप शुभेच्छा.”

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू

“स्वतःला जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही”

ऋषभ पंतने माहीचा हा विक्रम मोडत झाला नंबर वन यष्टीरक्षक

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष मोठा?; फायनल आकडे आले समोर

भारतातील ‘या’ प्रदेशात पहिल्यांदाच आढळला कोरोनाचा रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More