बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पाशवी बलात्काराच्या घटनेनंतरही पाठ थोपटून घेणं हे स्वाभाविक”

मुंबई | 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री मुंबईतील साकीनाका येथे एका नराधमाने 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. या घटनेनं संपुर्ण महाराष्ट्राला हादरवलं आहे. आरोपीने बलात्कारानंतर महिलेच्या गुप्तांगात सळई घातल्याने ही महिला गंभीर जखमी झाली होती. तसेच मोठ्या प्रमाणात रक्त प्रवाह झाल्याने पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं भाजप आणि राज्य सरकारमध्ये राजकरण पेटल्याचं दिसत आहे.

या घटनेनंतर भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधत कायद्याचा धाक उरला नसल्याचं म्हटलं आहे. याला उत्तर देत शिवसेनेच्या ‘सामना’ आग्रलेखातून राज्य सरकारने आपली भूमिका मांडली. यावेळी विरोधी पक्षाने आपली भूमिका चोख पारली असून ते सांगतात त्याप्रमाणे आरोपीला फाशी होणार असल्याचं, म्हटलं आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरण डोळ्यात पाणी आणण्यासारखं आहे, मात्र नकाश्रू ओघळू लागले की प्रकरणाचं गांभीर्य नष्ट होतं, असं देखील शिवसेना नेते खासदार संजय राऊत सामानातून म्हणाले आहेत. राज्य सरकारने मांडलेल्या भूमिकेला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.

कित्येक महिने मंत्रालयाची पायरी न चढणाऱ्या तसेच कायम घरी बसणाऱ्या नेत्याला ब्येष्ट मुख्यमंत्री ठरवणारे मुखपत्र, पाशवी बलात्काराच्या घटनेनंतरही पाठ थोपटून घेणं हे स्वाभाविक असं म्हणत निर्लज्जपणा दुसरं काय, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे राज्य सराकरवर टीकास्त्र सोडलं आहे.

पाहा ट्विट

थोडक्यात बातम्या-

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ED चं मोठं पाऊल!

छोट्या कियाराचा सोशल मीडियात धुमाकूळ; व्हिडीओ तुफान व्हायरल

मोठी बातमी! किंग कोहली कर्णधारपदावरून होणार पायउतार?, ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयची नजर

“भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती, पण मी पैसे न घेता पक्षात आलो”

रहाटणीतील ‘लेगसी ऑरा’ चा अनोखा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More