बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

येत्या निवडणूकीमध्ये एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण…, – देवेंद्र फडणवीस

मुंबई | ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्यावरून सतत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. जनगणनेचा नाही तर एम्पिरेकल डाटा सरकारला द्यायचा होता. आणि हे सगळं सरकारला माहित असूनही, जनतेची केवळ दिशाभूल केली जात असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा राज्य सरकावर टीका केली आहे.

आज ओबीसी आरक्षणाच्या अभियानाचा शुभारंभाचा सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. प्रकरण फक्त 5 जिल्ह्यांचे आणि आरक्षण गेलं संपूर्ण राज्याचं. हे सगळं सरकारला माहिती आहे. तरीही विधानसभेत ठराव केला गेला. या षडयंत्रामागे केवळ फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असून, तोपर्यंत या सरकारला वेळ काढायचा असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

येत्या निवडणुकीत पाच जिल्ह्यांमध्ये आम्ही केवळ ओबीसी समाजाला तिकीट देण्याचं ठरवलं आहे. मग एखादा उमेदवार निवडणुकीमध्ये निवडुन नाही आला तरी चालेल. परंतू आम्ही आता जोपर्यंत ओबीसी आरक्षण पुर्ववत होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं, फडणवीसांनी म्हटलं आहे.

तसेच आम्ही येत्या फेब्रुवारीपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी 4 महिन्यांमध्ये आम्ही जो एम्पिरिकल डेटा गोळा केला. हा डेटा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केला आहे. मंत्री छगन भुजबळ हे माझ्या घरी येऊन गेले. त्यांनाही मी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘…म्हणून गेले दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले नाहीत’; रोहीत पवारांनी सांगितलं कारण

वेगवेगळ्या दुर्घटनेत मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल इतक्या निष्पाप नागरिकांचा बळी

‘…म्हणून ईशानने पहिल्याच चेंडूवर ठोकला षटकार’; ईशानच्या सिक्सरचं ड्रेसिंग रूम कनेक्शन

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आयुषमानच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल, पाहा फोटो!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More