‘उद्या गाढव सत्तेत आलं तरी …’, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नागपूर| वंचित बहुजन आघाडीतर्फे(Vanchit Bahujan Aaghadi) मंगळवारी नागपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. महापुरूषांच्या झालेल्या अपमानाच्या निषेधार्थ आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडक(Prakash Ambedkar) यांनी संबोधित केलं. यावेळी आंबेडकर म्हणाले की, उद्या गाढव सत्तेत आलं तरी माजलेल्याला धोपाटणं दिल्याशिवाय गत्यंतर नाही. जोपर्यंत आपण आपल्या अधिकारांसाठी लढत नाही तोपर्यंत आपण ज्याच्या हाती सत्ता दिली आहे तो काबूत राहत नाही.

आता सगळं उलटं होत आहे, ज्याच्या हाती आपण सत्ता दिलीय तोच आपल्याला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं धोकादायक आहे, कारण यामुळं लोकशाही धोक्यात येत आहे, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.

रस्ता आणि आमचं नात 40 वर्षांचं आहे. महाराष्ट्र सरकारला अवाहन आहे की हा निर्णय आम्हाला वापरायला लावू नका. कारण जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्हाला आमच्यासोबत रस्त्यावर झोपावं लागेल, असा सूचक इशारा आंबेडकरांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, ज्या जमींनींचा प्रश्न आहे, तो लवकर सोडवा. हा फक्त अतिक्रमणाचा प्रश्न नाही तर शहरांचा प्रश्न आहे. कारण संपूर्ण शहरच अतिक्रमित आहेत. हा प्रश्न जटील होण्यापूर्वी ज्यांनी अतिक्रमण केलं आहे, त्यांच्या नावावर संबधित बांधकाम करा,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-