बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जर गाडीत चहाचा थेंब जरी सांडला तर मी…’; गडकरींची कंत्राटदारांना तंबी

मुंबई | आपल्या बिंधास्त आणि रोखठोक स्वभावामुळे सर्वत्र नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत. केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या कामाच्या झपाट्याने सर्वत्र प्रसिद्ध आहेत. तसेच ते देशभरात तयार करत असलेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे त्यांचं कौतुक होत असतं. त्यांनी सांगितलेल्या किस्स्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते.

नितीन गडकरींनी मागील काही दिवसांपूर्वी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे वरून प्रवास केला आहे. त्यावेळी त्यांनी गाडीचं स्टेरिंग कत्राटदाराच्या हातात देऊन त्यांनी प्रवास केला होता. त्यातच आता गडकरी 1996 साली युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांनी 1998 मध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वे बांधला. तेव्हा या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी टेस्ट ड्राईव्ह घेतला होता. त्यावेळी त्यांनी 130 प्रतितास किमीच्या वेगात धावणाऱ्या गाडीमध्ये चहा घेतला होता. हा किस्सा गडकरींनी एका कार्यक्रमात बोलून दाखवला आहे.

मुंबई-पुणे रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार हिंदूस्तान कंस्ट्रक्शन कंपनीचे मालक अजित गुलाबचंद हेही गडकरींसोबत होते. जेव्हा गाडी 120-130 प्रतितास किमी वेगाने असणार तेव्हाच मी गाडीमध्ये चहा पिणार आणि गाडीमध्ये चहाचा थेंब जरी सांडला तरी मी कारवाई करणार अशी तंबी गडकरींनी कंत्राटदाराला दिली होती.

दरम्यान, नितीन गडकरींनी थर्मासमध्ये टाकून चहा पिला पण, एकही थेंब सांडला नाही. त्यामुळे कंत्राटदाराला चांगला रस्ता बांधला असल्याची पोचपावती मिळाली होती, असं गडकरींनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“मी गुडघ्यावर बसण्यास तयार”, अखेर क्विंटन डिकाॅकची माघार

‘…म्हणून पाकिस्तान जिंकल्यावर मी स्टेटस ठेवलं’; माफी मागत नफीसानी सांगितलं कारण

‘अटकेपूर्वी 3 दिवस आधी…’; समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

“ड्रग्ज हे जीवनाश्यक, ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे”

मोठी बातमी! अखेर आर्यन खानला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More