बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपने राज्यातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही- उदय सामंत

मुंबई | काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. या विस्तारात राज्यातून भाजप नेते नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. या नवनियुक्त मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने राज्यात जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन केलं आहे. आगामी महापालिका निवडणूका आणि शिवसेनेला शह देण्यासाठी या यात्रा चालू आहेत.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपला फटकारलं आहे. भाजपने राज्यातून 40 जणांना मंत्री केलं तरी महाराष्ट्रातून शिवसेना संपणार नाही. या जन आशीर्वाद यात्रेला राज्यात कसलाही प्रतिसाद मिळणार नाही. जनतेने बीडमध्ये कसा प्रतिसाद दिला हे राज्यातील जनतेनं पाहिलं आहे, असा टोला उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे. सामंत हे माध्यमांसोबत बोलत होते.

एका वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळालं आहे. भाजपने उद्धव ठाकरेंची कितीही प्रतिमा मलीन केली तरी उद्धव ठाकरे हे सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री राज्याचं उत्तमरित्या नेतृत्व करत आहेत हेच या सर्वेक्षणात सिद्ध होतं. त्यांनी देशाचं पण नेतृत्व करावं असा कौल या सर्वेक्षणात दिसत आहे, असं उदय सामंत म्हणाले.

दरम्यान, कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत. मुख्यमंत्र्यासह पंतप्रधानांची सुद्धा हिच भूमिका आहे. कोणत्याही व्यक्तीने नियमाचं उल्लंघन करू नये, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या –

मद्रास उच्च न्यायालयाने सीबीआयला म्हटलं पिंजऱ्यातील पोपट; केंद्र सरकारला दिले ‘हे’ आदेश

हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केल्याने स्वरा भास्कर सोशल मीडियावर ट्रोल!

“नारायण राणेंसारखा बाडगा आणि बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही”

‘आमच्या संघात खूप एकी, एकाला डिवचाल तर…’; के. एल. राहुलचा इंग्लंडच्या खेळाडूंना टोला

हातात बंदुका घेऊन इलेक्ट्रिक कार चालवताना दिसले तालिबानी, व्हिडीओ व्हायरल

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More